Sugarcane Balbandhani: उसातील बाळबांधणी करताना काय काळजी करावी?

उसाच्या लागवडीनंतर त्याला इतर पिकांसारखं फार बघावं लागत नाही.. पण उसातली बाळबांधणी आणि मोठी बांधणी फार महत्त्वाची असते.. बाळबांधणी म्हणजेच फक्त उसाला माती लावणं एवढंच नसतं.. त्यामध्ये जेठा कोंब काढणं, खत देणं, माती लावणं या सगळ्या गोष्टी येतात.. त्यामुळं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने बाळबांधणी केली की फुटवे चांगले फुटतात, मुळांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढीसाठीही मदत मिळते.. मग नेमकी केव्हा करायची बाळबांधणी, त्याची योग्य पद्धत काय आहे आणि बाळबांधणीचे फायदे नेमकी काय आहेत.. यासाठी पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमधल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.. तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com