Sugar Price : राज्य सरकारची ऊस गाळपाची घेई शेतकऱ्यांना फटका देणार?

यंदा ऊस गाळप हंगाम नेहमीपेक्षा तब्बल महिनाभर आधी, म्हणजे १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे देशांतर्गत बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये, सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढू नयेत आणि ग्राहकांना साखर महाग पडू नये. पण या निर्णयाचा दुसरा चेहरा काय आहे? लवकर गाळप सुरू झाल्यामुळे कमी पक्वतेचा आणि कमी वजनाचा ऊस कारखान्यांना द्यावा लागला, तर त्याचा फटका थेट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नाला बसू शकतो. मग साखर स्वस्त ठेवण्याची किंमत पुन्हा शेतकऱ्यानेच का मोजायची? आणि जर सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई केली नाही, तर या निर्णयातून नेमका फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा? याच महत्त्वाच्या प्रश्नांवर आजच्या शोमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com