Sugar Import : केंद्र सरकारच्या साखर आयातीमुळे साखर दरावर काय परिणाम होईल?

साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्याने केंद्र सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला आहे. जवळपास दशकभरानंतर भारताने कच्ची साखर आयात करण्याचा मार्ग खुला केला आहे. सरकारने १० लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. पण सरकारला अचानक साखर आयात करण्याची वेळ का आली? देशात साखरेची खरंच कमतरता आहे का? आयात झाल्यानंतर साखरेचे दर कमी होतील का? आणि दुसरीकडे, उसाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच सरकारने हा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com