Video
Soybean Rate: सोयाबीनचा भाव १० हजारांवर जाणार? तेजीमागची कारणं काय?
Soybean Prices Today:बाजारात सोयाबीनची आवक वाढत असतानाही दरात सुधारणा होत आहे. यंदा उत्पादनातील घट, स्टॉकिस्टची खरेदी आणि प्रक्रिया उद्योगाकडून मिळणारा उठाव यामुळे सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला विक्रमी बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.सध्या सोयाबीनचा सरासरी बाजारभाव किती आहे? पुढील काळात भाव ६,५०० रुपयांच्या पुढे टिकू शकतील का? सोयाबीन १० हजार रुपयांचा टप्पा गाठू शकते का? तसेच, जीएम सोयापेंड आयातीला परवानगी मिळाल्यास बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?जाणून घ्या सोयाबीन बाजारातील तेजीची कारणं, पुढील काळातील संभाव्य घडामोडी आणि सोयाबीन विक्रीचे नियोजन करताना लक्षात घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे.
