Video
Soybean: सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान
आज देशातील बाजारात जवळपास २ लाख ७० हजार क्विंटलची आवक झाली होती. मध्य प्रदेशातील आवक आजही जास्त आहे. तर महाराष्ट्रातील आवक काहीशी कमी आहे. राजस्थान आणि इतर राज्यांमधील आवकही कमी आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सोयाबीनची आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरालाही आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
