Video
Soybean Oil: सोयातेलाची आयात नोव्हेंबरमध्ये १८ टक्क्यांनी कमी
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयातेलाचे भाव पामतेलापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सोयातेलाची आयात नोव्हेंबरमध्ये १८ टक्क्यांनी कमी झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत सोयातेलाची आयात कमीच राहण्याची शक्यता आहे. याचा आधार देशातील सोयाबीन बाजारालाही राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
