Video
Soybean Crop Damage : कोरड्या दुष्काळाने शिक्षित तरुण शेतकरी संकटात; मदतीची अपेक्षा
नमस्कार शेतकरी मित्रांनो! यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे पिकं पूर्णपणे जळून गेली आहेत. आता पाऊस पडला तरी हातात आलेलं पीक वाचण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे निसर्गाकडून नव्हे, तर व्यवस्थेकडून मिळणाऱ्या मदतीच्या आशेवर शेतकरी आहेत.जालन्यातील शेतकरी शिवाजीराव यांनी यंदाच्या परिस्थितीचा अनुभव सांगताना गेल्या वर्षीच्या चांगल्या पावसाची आठवण सांगितली. विशेष म्हणजे आजची शेती करणारी पिढी ही शिक्षित आणि आधुनिक विचारांची आहे. शिवाजीराव यांनी हॉर्टिकल्चर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. अशा शिक्षित तरुणांनी शेतीत राहून नवी उमेद निर्माण करावी, यासाठी संकटाच्या काळात त्यांना आधार आणि मदत मिळणं महत्त्वाचं आहे.यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांसमोर नेमकं कोणतं संकट उभं केलं आहे? पाऊस उशिरा आल्यास त्याचा किती फायदा होऊ शकतो? आणि नव्या पिढीतील शेतकऱ्यांना आता कोणत्या मदतीची अपेक्षा आहे? जाणून घेऊया.
