मक्याचे भाव स्थिर: सांगली-मिरज बाजारात मक्याची आवक ८५ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर २ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते. अहमदपूर बाजारात मक्याची आवक किरकोळ म्हणजेच ३ क्विंटल झाली होती. दर प्रति क्विंटलला सरासरी दर २ हजार रुपये मिळाला होता. मालेगाव बाजारात मक्याची आवक २६ क्विंटल झाली होती. तर सरासरी दर २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल झाले..मूग दबावात:अकोला बाजारात मूगाची आवक ३८ क्विंटल झाली होती. सरासरी दर ६ हजार ७८५ रुपये प्रति क्विंटल होते. चोपडा बाजारात मूगाची आवक १५ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर ६ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. .काकडी दर स्थिर: नागपूर बाजारात काकडीची आवक ३०० क्विंटल झाली होती. तर सरासरी दर १ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल झाले. तर, मोशी बाजारात लोकल काकडीची २२० क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाले. श्रीरामपूर बाजारात काकडीची आवक २४ क्विंटलवर स्थिर होती. सरासरी दरही १ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले..डाळिंबाच्या भावात चढ-उतार: आज अकलूज बाजारात भगवा डाळिंबाची आवक ३४२ क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर १४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल झाले. तर, सांगली बाजारात ३० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर ८ हजार रुपये प्रति क्विंटल झाले. नागपूर बाजारात डाळिंबाची आवक ८ क्विंटल झाली होती. सरासरी दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले..टोमॅटो भाव कायम: आज कोल्हापूर बाजारात टोमॅटोची आवक २९१ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर १ हजार २०० रुपये प्रति क्विंटल झाले. तर, नागपूर बाजारात टोमॅटोची आवक ७०० क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल झाले. खेड-चाकण बाजारात टोमॅटोची आवक २६५ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर ३ हजार रुपये प्रति क्विंटल झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.