Video
Soybean Charcoal Rot: सोयाबीनवर पाण्याचा ताण आहे की मूळकुज कसे ओळखावे?
सोयाबीनचं पीक सध्या ५० ते ६० दिवसांच्या अवस्थेत आहे.. म्हणजेच फुलोरा, शेंगा लागणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.. त्यात आता पावसाचा खंड, वाढलेलं तापमान यामुळं सोयाबीन पिकामध्ये मूळकुज म्हणजेच चारकोल रॉट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.. मूळकुजमुळं पिकाचं नुकसान होतं आणि उत्पादनावर परिणाम होतो.. त्यामुळं केवळ पाण्याचा ताण आहे की मूळकुज आहे हे व्यवस्थित ओळखून त्यावर लवकरात लवकर उपाय केले तर पीक आणि उत्पादन वाचवणं शक्य होतं.. कोणते आहेत हे उपाय, मुळात पाण्याचा ताण आणि मूळकुज हे कसं ओळखायचं.. आणि यासाठी कमी खर्चातले उपाय आहेत का.. या सगळ्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून..
