Video
Soybean Rate: देशातील उत्पादनात केवळ २ टक्के घट झाल्याचा सोपाचा अंदाज
Soybean Production:देशात यंदा सोयाबीनचा पेरा पाच टक्क्यांनी वाढला असला तरी २.११ टक्क्यांनी घटून १०७.९३ लाख टनांवर येईल, असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) व्यक्त केला आहे. पावसाचा दीर्घ खंड आणि ओलाव्याच्या ताणामुळे ७.७६ लाख हेक्टरवरील पीक काढणीपर्यंत पोहोचलेच नाही, हे घटीचे मुख्य कारण असल्याचे ‘सोपा’ने म्हटले आहे.
