Video
Silage Making: मुरघास खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
या वर्षी फार कमी पाऊस झाला.. इथून पुढे कमीच पावसाची शक्यता वर्तवली जातीये.. त्यामुळं आपल्याला आतापासून चाऱ्याचं नियोजन करुन ठेवायचंय.. यामध्ये मुरघास हा चारा नियोजनातला रामबाण उपाय. कारण तो कमी खर्चात, कमी वेळात तयार होतोच शिवाय तो जवळपास वर्षभर टिकतो आणि त्यातले पोषक घटकही टिकून राहतात.. त्याचा परिणाम काय होतो.. तर पौष्टिक चाऱ्यामुळं उत्पादनात सातत्य राहतं, खर्चात बचत होते, उत्पन्नात वाढ होते तसंच पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईतही जनावरांना चारा देता येतो.. पण हा मुरघास तयार करताना काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे.. कारण मुरघास गुणवत्तापूर्ण असेल तरच जनावराला तो देता येतो आणि त्यापासून पोषण मिळतं.. त्यामुळं मुरघास बनवायची योग्य पद्धत काये, मुरघासची गुणवत्ता कशी टिकवायची.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
