Shetkari Mitra Maharashtra : शेतकरी मित्र नेमके कोण असतील, त्यांची निवड कशी होणार?

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाच्या योजना, शेतीशाळा, नैसर्गिक शेती आणि विविध कृषी मोहिमा पोहोचवण्यासाठी आता गावपातळीवर ‘शेतकरी मित्र’ काम करणार आहेत. राज्यात तब्बल ११ हजार ५८७ शेतकरी मित्र मानधनावर नेमण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. पण हे शेतकरी मित्र नेमके कोण असतील, त्यांची निवड कशी होणार, त्यांना किती मानधन मिळणार आणि त्यांच्या कामाचं मूल्यांकन कसं होणार? याचबरोबर या नियुक्त्या कायमस्वरूपी आहेत का आणि शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा काय होणार? जाणून घेऊया आजच्या ‘द ॲग्रोवन शो’मधून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com