September Rain Forecast : सप्टेंबरमध्ये पाऊस कमीच? IOD धन झाला तरी चमत्कार होणार नाही

नमस्कार शेतकरी मित्रांनो! सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असताना IOD, El Nino आणि MJO या हवामान प्रणालींची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. IOD धन झाला तर महाराष्ट्रात पाऊस वाढेल का? El Nino च्या प्रभावातही चांगला पाऊस होऊ शकतो का? आणि सप्टेंबरमध्ये पावसाला कोणत्या हवामान प्रणालीचा आधार मिळू शकतो?या मुलाखतीत हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की सप्टेंबरमध्ये IOD धन होण्याची शक्यता कमी असून, IOD धन झाला तरी पावसात अचानक मोठा बदल किंवा ‘चमत्कार’ होण्याची शक्यता नाही. २०२६ च्या मान्सूनवर El Nino चा दबाव महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मात्र MJO (Madden-Julian Oscillation) च्या हालचालींकडून सप्टेंबरमध्ये काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः MJO भारताच्या परीक्षेत्रात अनुकूल फेजमध्ये आल्यास काही दिवस पावसाला आधार मिळू शकतो.मग सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस किती होऊ शकतो? IOD, El Nino आणि MJO यांचा पावसावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com