Russian Agri Technology : दुष्काळावर मात करण्यासाठी रशियाने कोणतं तंत्रज्ञान सादर केलं?

Russian Agriculture:शेतीत पाण्याचा वापर ७० टक्क्यांपर्यंत कमी झाला, तर किती मोठा बदल घडू शकतो? जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकला, दुष्काळासारख्या परिस्थितीत पिकांना तग धरता आला आणि काढणीनंतर धान्याची नासाडीही कमी झाली तर? हवामान बदलामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी रशियानं असंच काही तंत्रज्ञान जगासमोर आणलंय. तुर्कियेतील जागतिक हवामान परिषदेत पाणीबचत करणारे पॉलिमर, दुष्काळात पिकांची तग धरण्याची क्षमता वाढवणारी उत्पादनं आणि किरणोत्सर्गाच्या साहाय्यानं अन्नधान्य टिकवण्याचं तंत्रज्ञान सादर करण्यात आलंय. पण रशियानं नेमकं काय विकसित केलंय? पाण्याची एवढी मोठी बचत कशी शक्य आहे? आणि या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना किती उपयोग होऊ शकतो? याबाबत काय दावे करण्यात आले आहेत? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...