Video
Weather Update : राज्यात सोलापूर येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद
maharashtra heatwave update: राज्यात सध्या पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका अशी दुहेरी स्थिती जाणवत आहे. मागील दोन दिवसांत किमान तापमानात थोडी घट झाल्याने पहाटे गारठा वाढला आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचा तीव्रपणा जाणवू लागला आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
