Video
Maharashtra Drought: अक्कलकोटमध्ये दुष्काळाचं भयावह वास्तव
Akalkot Drought:महाराष्ट्रात यंदा दुष्काळाची तीव्रता वाढत असून, पावसाअभावी नद्या-नाले आटले आहेत. अक्कलकोटमधील बोरी नदीपात्रही कोरडंठाक पडलं असून, दुष्काळाचं भीषण वास्तव समोर येत आहे. या दुष्काळाची दाहकता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी साम टीव्ही ग्राऊंडवर उतरलं आहे. सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. पाहा अक्कलकोटमधील दुष्काळाचा ग्राउंड रिपोर्ट.
