Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

राज्यात मागील दोन दिवसात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. परंतु पावसाचा जोर सर्वदूर नव्हता. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com