Video
Rain Update : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी शक्य
Maharashtra Weather:राज्यात उन्हाचा चटका कायम असून उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा पस्तीशीच्या पार आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहून कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
