Video
Rain Update : राज्यात पावसाची उघडीप राहणार? | Agrowon
राज्यात पावसाने उघडीप दिली असून तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत आहे. राज्यात आजही प्रामुख्याने उघडीप राहून तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. आज धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
