Video
Rain Update : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर किती दिवस?
राज्यात काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. मात्र या सरी सर्वदूर नाहीत. तर काही भागात उन्हाचा चटका कायम आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज विदर्भात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
