Video
Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज; कोणत्या भागात जोर?
राज्यात परतीच्या पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी काही ठिकाणी हजेरी लावत आहेत. परंतु सर्वदूर पावसाची सरी हजेरी लावत नाहीत. त्यामुळे अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
