Video
Rain Update : मॉन्सूनची राजस्थानच्या काही भागातून माघार; राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज
मॉन्सूनचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. मॉन्सूनने आज पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार घेतली आहे. तसेच, पुढील ३ ते ४ दिवसांत राजस्थानच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या काही भागांतून मॉन्सूनच्या माघारीसाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
