Video
Rain Update : विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
राज्यात बहुतांश भागात पावसाने दडी मारली असली तरी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उन्हाचा चटकाही काहीसा वाढला असून उकाडा जाणवत आहे. १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मॉन्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. तर राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत असून आज काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
