Video
Rain Update : विदर्भात जोर वाढणार; मराठवाड्यात पावसाची शक्यता
राज्यात पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. खरीप पिकं माना टाकू लागली आहेत. आज मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
