Video
Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा 'येलो अलर्ट'; उर्वरित राज्यात उघडीप
राज्यात बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असून कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात पावसाने उघडीप दिल्याने पिकं तहानलेली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
