Video
Rain Update : राज्यात पावसाची शक्यता; कोणत्या भागात जोर?
राज्यात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून वारे वाहू लागले आहेत.आजही राज्यात पावसाचा अंदाज कायम असून कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मात्र प्रामुख्याने उघडिपीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
