Video
Rain Update : राज्यात पावसाची उघडीप; कोणत्या भागात पावसाची शक्यता?
Maharashtra Rain Forecast Today : मॉन्सूनचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात आजही प्रामुख्याने पावसाची उघडीप राहून ऊन-सावलीचा खेळ अनुभवायला मिळत आहे. तर काही भागात उन्हाचा चटका वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तसेच काही भागात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
