Video
Rain in 2026 : सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट कायम राहणार?
देशातील पावसाची तूट आणखी वाढण्याचा इशारा मिळतोय. त्यातच एल निनोची स्थिती मजबूत होत असल्याने ऑगस्टच्या अखेरीपासून पावसाचा जोर कमी होऊन सप्टेंबरमध्येही पावसाचा तुटवडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट म्हणजेच ECMWF च्या अंदाजानुसार, यंदाच्या मॉन्सूनचा चांगला टप्पा कदाचित आता मागे पडला असण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे हवामान विभागाच्या मते ऑगस्टच्या उर्वरित काळात पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढचा काळ नेमका कसा असणार आहे, देशातील पावसाची तूट कुठे किती आहे आणि खरीप पेरणीवर त्याचा किती परिणाम झाला आहे, हे आजच्या अग्रोवन शोमधून समजून घेऊया.
