Video
Monsoon Rain: राज्यात आज आणि उद्या ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज
Maharashtra rain forecast: राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र, मागील चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली असून शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज वर्तवला आहे.