Rain Forecast : पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात पाऊस कुठे? विदर्भ-मराठवाड्यात काय स्थिती?

नमस्कार शेतकरी मित्रांनो! पुढील आठ ते दहा दिवसांत महाराष्ट्रातील पावसाची स्थिती कशी राहणार? IMDच्या मॉडेल्सनुसार राज्यातील कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आणि कुठे पावसाची उघडीप कायम राहू शकते, याचा अंदाज या व्हिडीओतून जाणून घेऊया.भारत फोरकास्ट सिस्टम म्हणजेच BFSनुसार पुढील २४ तासांत उत्तर-पूर्व मध्य प्रदेशात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भाग आणि कोकण किनारपट्टीवरही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.पुढील काही दिवसांत प्रणाली उत्तर किंवा पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकताना दिसत आहे. ६ सप्टेंबरदरम्यान पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात पावसाचा प्रभाव राहू शकतो. महाराष्ट्रात विदर्भ, कोकण-गोवा आणि घाटमाथा वगळता इतर भागांत तुरळक हलक्या पावसाची शक्यता दिसत आहे.८ ते १० सप्टेंबरनंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील पावसाच्या स्थितीत काही बदल दिसू शकतो. त्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक प्रणाली तयार होण्याची शक्यता असून, तिच्या हालचालीमुळे विदर्भात पावसाचे प्रमाण वाढू शकते.मात्र पाच-सहा दिवसांनंतर मॉडेल्समधील त्रुटी वाढत असल्याने हा अंदाज मार्गदर्शक म्हणूनच पाहावा. पुढील घडामोडीनुसार अंदाजात बदल होऊ शकतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com