Rain Deficit : राज्यातील कोणत्या भागात किती पाऊस कमी झाला?

राज्यात मॉन्सूनचे जवळपास साडेतीन महिने पूर्ण झाले असले, तरी पावसाचे वितरण अद्यापही असमान आहे. राज्यात दुष्काळाची मागणी जोर धरू लागली आहे. कारण राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी तब्बल २९८ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक तालुक्यांत पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर ताण वाढला आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा देशात मॉन्सून सरासरीच्या ९० टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, राज्यातील पावसाची प्रत्यक्ष स्थिती पाहता अनेक भागांत पावसाची मोठी तूट कायम आहे. मग राज्यातील नेमकी पावसाची स्थिती काय आहे? कोणत्या भागात किती पाऊस कमी झाला? आणि या पावसाच्या खंडाचा पिकांवर नेमका काय परिणाम होतोय? पाहूया आजच्या ‘द ॲग्रोवन शो’मध्ये.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com