Rain After Dry Spell: पावसाने मोठी उघडीप दिल्यावर पिके कशी जगवावी?

पावसाच्या दीर्घ खंडानंतर आता पावसाची शक्यता वर्तवली जातेय.. जेव्हा पावसाचा ३० - ४० दिवसांचा खंड पडतो.. अशा परिस्थितीत पिकांमध्ये शारीरिक आणि जैवरासायनिक ताण निर्माण होतो.. ज्यामध्ये पानांची लवचिकता कमी होते, ती वाकतात, कोमजतात, फुलगळ, शेंगा आणि बोंडांची संख्या कमी होते.. पानं गळतात.. आणि या सगळ्याचा परिणाम उत्पादनावर पडतो.. त्यामुळं जेव्हा खूप दिवसांनंतर पाऊस पडतो तेव्हा आपल्याला पिकाची काळजी घ्यावी लागते.. कारण फक्त पाऊस पडून पिकाचा ताण कमी होत नाही.. पिकाला ओलावा मिळणं, त्याची वाढ होणं, उत्पादन टिकवणं यासाठी प्रयत्न करणं, काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं.. कशी घ्यायची ही काळजी.. यासाठी अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी माहिती दिलीये.. तीच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमध्ये..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com