Video
Rabi Season : जमिनीतील ओलावा घटला; रब्बी पिकांसमोर मोठं संकट?
Rabi Crops:खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामावरही संकटाची छाया आहे. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मॉन्सूननंतर जमिनीत साठलेला ओलावा महत्त्वाचा असतो; मात्र यंदा अनेक भागांत जमिनीतील ओलावा दशकाच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यातच सप्टेंबरमधील पावसाची तूट आणि वाढलेले तापमान यामुळे जमिनीतील ओलाव्यावर आणखी ताण आला आहे.
