Video
Pulses Price Trend : सरकार आयात करून भाव कमीच ठेवण्यात यशस्वी होईल का ?
देशातील बाजारात कडधान्याची आवक कमी सध्या कमी आहे. पण जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे खरिपातील कडधान्याच्या भावात नरमाई पाहायला मिळाली. हवामान विभागाचा अंदाज पाहता पुढील काळात उत्पादनाविषयी चिंता निर्माण होऊ शकते. पण बाजारावर सध्याची पावसाची परिस्थिती, लागवड, देशात उपलब्ध कडधान्याचा सध्याचा साठा, सरकारकडील बफर साठा, आयातीला पुरक धोरण आणि हरभरा वगळता इतर कडधान्याची सुस्त मागणीचा परिणाम दिसत आहे. भविष्यात देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट होईल जाईल तसा बाजारही बदलताना दिसणार आहे.
