Pulses Diseases: मूग उडीदवरील रोगांचे नियंत्रण आणि तुरीची शेंडा खुडणी कशी करावी?

सध्या मूग उडीद शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.. यंदा मुळातच कमी पाऊस, मध्येच जास्त पाऊस या कारणांमुळं पिकाच्या वाढीमध्ये अडथळे आले.. आता मूग आणि उडिद कसेबसे पीक वाढून शेंगा लागत असताना मात्र त्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुळातच मूग उडिद हे कमी दिवसाचे आणि कमी खर्चाचे पीक. त्यामुळे जास्त त्यावर खर्च करण्याची इच्छा कोणाची नसते.. पण या रोगांमुळे पानांवर चट्टे, ठिपके पडतात आणि परिणाम? उत्पादनात घट. त्यामुळे रोगांचं वेळीच नियंत्रण केलं तर पीक आणि उत्पादन वाचवणं शक्य होतं.. याशिवाय तुरीचं पीक वाढीच्या अवस्थेत आहे.. त्यामध्ये वेळीच शेंडा खुडणी केल्यास उत्पादन वाढ मिळते. कसं करायचं रोगांचं नियंत्रण, आणि तुरीची शेंडा खुडणी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com