Video
Pressmud Uses: प्रेसमडचा वापर करून दुष्काळात जमिनीतील ओलावा कसा टिकवावा?
Pressmud Fertilizer:दुष्काळाच्या परिस्थितीत जमिनीला जास्तीत जास्त सेंद्रिय खतं देणं उपयोगाचं ठरतं.. कारण सेंद्रिय खतांमुळं जमिनीची सुपीकता वाढते, तिची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.. शेणखत, कंपोस्ट ही खतं तर आपल्याला माहितीच आहे.. पण त्यांना तयार होण्यासाठीही काही काळ लागतो.. त्यामुळं आज आपण असं खत पाहुयात जे सध्या तुमच्या जवळच्या साखर कारखान्यातच तयार होतंय.. कोणतं आहे हे खत? तर हे आहे प्रेसमड.. प्रेसमड हा उसापासून साखर बनवताना बाहेर पडणारा एक बायप्रोडक्ट म्हणजेच उपपदार्थ आहे.. पण हा शेतीसाठी उपयोगाचा कसा ठरतो.. असं काय असतं त्यामध्ये.. आणि दुष्काळात तो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा का आहे.. हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
