Video
Pregnant Goat Care : कसा ठेवावा पावसाळ्यामध्ये गाभण शेळ्यांचा आहार?
'डॉक्टर, कालपर्यंत शेळी व्यवस्थित होती.. आज अचानक चारा खाणं बंद केलंय.' किंवा 'गाभण शेळीचा गर्भपात झाला..' अशा तक्रारी पावसाळ्यात पशुवैद्यकांकडे खूप मोठ्या प्रमाणात येतात. कारण पावसाळा हा गाभण शेळ्यांसाठी सर्वात संवेदनशील काळ असतो.. त्यात पावसाळ्यातच शेळ्यांचं गाभण राहण्याचं आणि व्यायचं प्रमाणही जास्त असतं.. गोठ्यातला ओलसरपणा, हिरव्या चाऱ्याचं वाढलेलं प्रमाण आणि बदललेलं हवामान यामुळं गाभण शेळ्यांना अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळं पावसाळ्यात गाभण शेळ्यांची नेमकी कशी काळजी घ्यायची, पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
