Video
Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता
Rain Forecast: राज्यातील काही भागांत सध्या उन्हाचा तीव्र चटका जाणवत असताना काही भागांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. विदर्भात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
