Video
Pathenium Weed Control: गाजर गवतासाठी कोणते तणनाशक वापरावे.
पावसाळा सुरु झाला की तण झपाट्यानं वाढू लागतं.. त्यातलंच एक अत्यंत उपद्रवी तण म्हणजे गाजर गवत म्हणजेच काँग्रेस गवत, पांढरीफुली, चटकचांदणी. सगळीकडं हे गवत आढळून येतं.. आणि मुळातच हे तण अतिशय वेगानं वाढतं.. कारण या झाडाला पांढऱ्या रंगाची फुलं येतात आणि त्यापासून बी तयार होतं. या बिया काळसर, लंब वर्तुळाकार, लहान आणि वजनाने हलक्या असतात. त्यामुळं वाऱ्याने त्या दूरवर पोहोचतात.. आणि एका झाड किती बिया तयार करु शकते माहितीये.. तब्बल ५ ते २५ हजार.. याशिवाय ते शेतातल्या मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यांचीसुद्धा स्पर्धा करतात.. त्याचा वास उग्र असल्यामुळं जनावरं पण ते सहसा खात नाहीत.. शिवाय त्याच्यामुळं वेगवेगळ्या ॲलर्जी पण उद्भवतात.. त्यामुळं सजीवांच्या आरोग्यासाठी ते हानीकारक ठरतं.. अगदी ते उपटताना त्याचे परागकण शरीरात जाऊन खोकला शिंका, दमा असे त्रास होऊ शकतात.. त्यामुळं गाजर गवताचं नियंत्रण प्रभावीपणे होऊ शकतं.. पण कसं करायचं हे नियंत्रण जाणून घेऊयात..
