Video
Onion Rate: बाजारभावापेक्षा कांदा खरेदीचा भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची पाठ
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या ‘किंमत स्थिरीकरण निधी’ योजनेअंतर्गत १५ मेपासून सुरू झालेल्या कांदा खरेदीला दोन महिने उलटूनही अपेक्षित गती मिळालेली नाही. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या दोन्ही संस्थांना देण्यात आलेल्या दोन लाख टनांच्या उद्दिष्टापैकी १५ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार टन, म्हणजेच १७ टक्के कांद्याचीच खरेदी झाली आहे. खुल्या बाजारातील तुलनेने अधिक दर आणि सरकारी खरेदीतील विविध अटी-शर्ती यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
