Video
Drought 2026: ट्रिगर-२ आणि महामदत पोर्टलबाबत कृषिमंत्र्यांचं स्पष्टीकरण
Maharashtra Farmer Relief:कर्नाटक सरकारने ऑगस्ट महिन्यातच दुष्काळ जाहीर केला, तर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यास विलंब का झाला? या प्रश्नावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शक सूचनांनुसार ठरलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानुसार महाराष्ट्राने ऑक्टोबरपर्यंतची प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, दुष्काळ निश्चित करण्याच्या प्रक्रियेतील ट्रिगर-१, ट्रिगर-२ आणि ग्राउंड ट्रुथिंग या टप्प्यांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महामदत पोर्टल बंद असल्याने ट्रिगर-२ चा डेटा उपलब्ध नसल्याचा मुद्दा समोर आला. यावर कृषिमंत्र्यांनी काय उत्तर दिले?
