Video
NDRF Madat : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरची मदत कधी मिळणार?
Farmer Aid:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. आज, १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री पुण्यात उपस्थित होते. राज्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून गेला आहे, तर रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एनडीआरएफची मदत कधी मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याची चर्चा आहे. मग या बैठकीत शाह यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काय माहिती घेतली? राज्य सरकारने या शेतकऱ्यांबाबत काय स्पष्टीकरण दिलं आहे? जाणून घेऊया आजच्या ‘द ॲग्रोवन शो’मधून.
