Video
Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon
Maharashtra Farmer Success Story: नमस्कार शेतकरी मित्रांनो! यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि मका यांसारख्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत तुती आणि रेशीम उद्योगाने शेतकऱ्याला मोठा आधार दिला आहे. या शेतकरी कुटुंबाने तुतीचे क्षेत्र वाढवत चार एकरांपर्यंत नेले आहे. मागील वर्षी रेशीम उद्योगातून चार बॅचमध्ये सुमारे ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले, तर खर्च सुमारे ९० हजार रुपये असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. यंदा पाण्याची मोठी अडचण असूनही तुतीला टँकरने पाणी देऊन रेशीम उद्योग सुरू ठेवला आहे. पाऊस पडला तर आणखी उत्पन्नाची शक्यता असल्याचे शेतकरी सांगतात. तुतीची लागवड कशी केली? रेशीम उद्योगातून किती उत्पन्न मिळते? पाण्याची कमतरता असतानाही हा उद्योग कसा टिकवला? आणि पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरते? जाणून घेऊया या विशेष ग्राउंड रिपोर्टमधून.
