Video
MSP& Loan Waiver : केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्याचा शब्द पूर्ण कधी करणार?
Minimum Support Price:तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना वर्षभर दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसावं लागलं होतं. शेकडो शेतकऱ्यांना या आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागला होता. अखेर केंद्र सरकारनं तीनही कृषी कायदे मागे घेतले. उर्वरित मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिलं. सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. पण आता जवळपास पाच वर्षांनंतर त्याच लेखी आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणखी एक पदर आहे. तो म्हणजे भारत-अमेरिका व्यापार कराराचा! एकीकडे देशांतर्गत बाजारात शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय, तर दुसरीकडे अमेरिकेतील शेतीमालाशी स्पर्धा करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहण्याची भीती शेतकरी संघटना व्यक्त करत आहेत. आणि यंदाच्या आंदोलनात शेतीच्या प्रश्नांसोबत मतदारयाद्यांचा मुद्दा का उपस्थित करण्यात आलाय? पाहूया आजच्या ॲग्रोवन शोमधून.
