Monsoon Return : देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

Weather News:मॉन्सूनने देशाच्या आणखी काही भागातून माघार घेतली आहे. तर पुढील २ ते ३ दिवसांत देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी आणि त्याचवेळी दक्षिण द्वीपकल्पीय भारतात ईशान्य मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. तर मॉन्सूनच्या परतीची सीमा आज कोलकाता, अंगुल, खम्मम, होनावर या भागातून जात आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com