Video
Monsoon Return : रब्बीसाठी पाऊस मिळणार का? परतीच्या मॉन्सूनबाबत मोठी अपडेट
नमस्कार शेतकरी मित्रांनो! यंदाच्या पावसाने राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा मान्सूनच्या परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. विशेषतः रब्बी हंगामासाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.या चर्चेत हवामान तज्ज्ञांनी २५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहू शकते, याबाबत माहिती दिली आहे. पुढील आठवड्यातही सध्यासारखीच स्थिती राहण्याची शक्यता असून, राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
