Monsoon Return: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात मात्र उघडीप कायम

राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत असून सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आज विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर देशात शनिवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा अर्थात मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com