Video
Monsoon Rain: विदर्भ, घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा अंदाज
कोकण आणि घाटमाथ्यासह राज्यातील काही भागात दोन दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडल्या आहेत. पण राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि घाटमाथ्यावर दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
