Video
Weather Update : राज्यात किमान तापमानात चढ-उतार शक्य
Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला असून त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये किमान तापमानात हळूहळू १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
