Rain Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज

Maharashtra Rain:राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने आणि अंशत: ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून उकाड्यातही वाढ झाली आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. आज म्हणजे गुरुवारी तापमानात चढ-उतारासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची तर दक्षिण कोकणात अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. परंतु या सरी सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता नाही. तसेच विदर्भात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
Loading content, please wait...